
- दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे.
जालना
मंठा पंचायत समिती कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित नसलेल्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करा
1) शासन निर्णय क्रमांक : समय-2016/प्र.क्र.62/18(र.वका.), दि. 24 फेब्रुवारी,2020
व वृत्तपत्रात प्रकाशित झालेली दि. 29 एप्रिल 2023 रोजीचा बातमीचा आधारघेत संदीप ठाकरे यांनी मंठा तहसीलचे तहसीलदारांना दिले निवेदन
निवेदनात म्हटले की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक : समय-2016/प्र.क्र.62/18(र.वका.), दि 24 फेब्रुवारी,2020 नुसार नागरिकांची कामे विहित वेळेत पार पाडणे करिता शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 9:45 ते 6:15 या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
मंठा पंचायत समिति विभागाच्या कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत 11:15 वाजता अधिकारी/कर्मचारी उपस्थित नसल्याची बातमी वर्तमान पत्रात पंखे सुरुच या मथळ्याची बातमी प्रकाशित झालेली आहे.
#ज्याअर्थी, आज दि.29 एप्रिल 2023 रोजी, वृत्तपत्र वाचत असताना कर्मचारी गैरहजर पंखे सुरुच बातमी निदर्शनास आली. सदर बातमी वाचली व बातमीतील छायाचित्र पाहिले असता, असे स्पष्ट होते की कार्यालयीन कामकाजाच्या 11:15 या वेळेत मंठा पंचायत समिति विभागाच्या कार्यालयातील टोटल टेबल व खुर्च्या रिकाम्या दिसतात, एकाच वेळी येवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अनुपस्थित असणे हि अत्यंत गंभीर बाब असल्याचे निदर्शनास येते.
ज्याअर्थी, वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमी वरुण हे स्पष्ट होते की, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक : समय-2016/प्र.क्र.62/18(र.वका.), दि 24 फेब्रुवारी,2020 नुसार नागरिकांची कामे विहित वेळेत पार पाडणे करिता शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 9:45 ते 6:15 या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बाबत दिलेल्या सुचनांचे, पंचायत समिति मंठा या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून उल्लंघन झाले असल्याणे संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी तसेच चौकशीअंती दोषी आढळलेल्या सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचा, कार्यालयीन कामकाजावेळी गैरहजर असलेल्या दिवशीचा 1 दिवसाचा पगार/वेतन कपात करण्यात यावे. तसेच संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून भविष्यात अशाप्रकारे चुका होणार नाहीत अशा नोटिस/सुचना देण्यात याव्यात निवेदनावर तक्रारदार
श्री संदीप प्रल्हादराव ठोकरे यांची स्वाक्षरी होती.