
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशीम –
वाशिम : पत्रकारांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने ११ मे रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात
आले. या पार्श्वभूमीवर वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आहे. यावेळी आंदोलक पत्रकारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
या निवेदनातुन शासनास पत्रकारांच्या विविध मागण्या शासनाकडे सादर करण्यात आल्या. यामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड
देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. त्यामुळे लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. अशा विविध मागण्या घेवून या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्या गेला. जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात जेष्ठ पत्रकार नंदकिशोर शिंदे, गजानन वाघ, शिखरचंद बांगरेचा, आतिश देशमुख, संघटनेचे विदर्भ कार्यवाह धनंजय कपाले, रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन धामणे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष राम धनगर, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा सचिव रमेश उंडाळ, उपाध्यक्ष आकाश पाटील शिंदे, अर्जुन खरात, विनोद बोडखे, दिलीप अवगण , प्रल्हाद पाटील पौळकर, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संदीप पिंपळकर, अजय चौथमल, सचिन साठे, मोहम्मद सलीम, पांडुरंग रेकडे, दिपक मापारी, श्रीकृष्ण खिल्लारे, आत्माराम जाधव, विकेश डोंगरे, वैभव पायघन, किरण पडघान, वसंत खडसे, निलेश सोमाणी, बाळासाहेब देशमुख, सुनील बांगर, संदीप डोंगरे, सुनिल कांबळे, महादेव घुगे, कैलास बनसोड, प्रदीप सावळे , विनोद तायडे, फिरोज शहा, संदीप भातुडकर आदिंसह व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी व विविध संघटनेच्या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, माजी आ़ अॅड़ विजयराव जाधव व शेतकरी नेते दामुअण्णा इंगोले यांनी पत्रकारांच्या आंदोलनाला भेट देवून पाठिंबा दर्शविला. यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.
चौकट 👇
संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्यांचे केले अभिनंदन व कौतुक.
राज्यात आज सर्वच ठिकाणी व्हॉईस ऑफ मीडियाचे जबरदस्त आंदोलन पार पडले. यात व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी खूप मेहनत घेतली. सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन आणि कौतुकही करतो. व्हॉईस ऑफ मीडियाची ताकद, महत्त्वाचे असणारे विषय कोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने मार्गे लागले पाहिजे. यासाठी आज एक महत्त्वाचं पाऊल उचलल्या गेलं याचा इतिहास झाला आहे. राज्यात अडीच हजार पत्रकार एका हाकेत कधीच रस्त्यावर आले नव्हते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माहिती महासंचालक यांना हे गंभीर विषय कळून चुकले. या विषयावर तातडीने मार्ग काढू असं आज सर्वांनी सांगितले. आपण सगळ्यांनी मिळून हे आंदोलन यशस्वी केलं, त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आभारही मानतो.