
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/परळी –पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडीने अटक केली आहे.अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
2014 साली परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.
या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्यावर सी आय डी मार्फत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी सीआयडी ने कस्तुरे यांना अटक केली. त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.