
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर- शितल रमेश पंडोरे
छत्रपती संभाजीनगर जिल्हाच्या खुलताबाद तालुक्यातील टाकळी येथे वडिलांना दारु पाजल्याच्या रागातून दोन सख्ख्या भावांनी एका तरुणाची चाकूने भोसकून निघेरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
करण बनकर व सुरज बनकर अशी हत्या करणाऱ्या आरोपी भावडांची नावे, तर बबन कुचे असे झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सध्या पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.
अशी घडली घटना.
बबन कुचे हे आपल्या घरी असताना करण नामदेव बनकर व सुरज (टगा) नामदेव बनकर या दोघ्या सख्ख्या भावांनी माझ्या वडिलांना दारु का पाजली म्हणत बबन कुचे यांच्यावर काठी कुऱ्हाडीने हल्ला केला व नंतर चाकू भोसकून खून केला. दरम्यान बबन कुचे यांना जखमी अवस्थेत खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.