दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहरातील मोंडा कॉर्नर येथे असलेल्या एटीएम मध्ये एका शेतकऱ्याच्या एटीएमची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून तब्बल एकाहत्तर हजार रुपये काढण्यात आल्याची घटना नऊ मे रोजी
देगलूर:घडली आहे.याप्रकरणी देगलूर तालुक्यातील सुंडगी येथील रहिवासी असलेले हे देगलूरशहरातील एसबीआय बँकेच्या एटीएम वर पैसे काढण्यासाठी गेले होते यावेळी एटीएम वर अन्य एक जण होता त्याने देशमुख यांच्या हातातील एटीएम बदलून त्यांच्या खात्यातून ७१ हजार रुपये काढून घेतले ही माहिती कळल्यानंतर देशमुख यांनी ते ग्रुप पोलिसांना तक्रार दिली यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय रेडकर हे करीत आहेत.