
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
————————————————–
४ दिवसांनंतर पोलीस तपासात फुटले बिंग
==========================
*लातूर/अहमदपूर*:-दारू पिऊन आईस त्रास देत असल्याने आईच्या मदतीने मुलांनी पित्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारून आणि नाका तोंडावर उशी दाबून खून केल्याचे चार दिवसानंतर पोलीस तपासात निष्पन्न झाले.ही घटना अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे रविवारी मध्यरात्री घडली होती.या प्रकरणी किनगाव पोलिसांकडून तीन आरोपीस अटक करण्यात आले. व्यंकट नारायण मारलापल्ले वय वर्षे (४८) असे मायताचे नाव आहे .पत्नी राधाबाई ,मुलगा सुरज व रामेश्वर यांना पोलिसांनी अटक केला आहे .ढाळेगाव येथील व्यंकट नारायण मारलापल्ले हे रविवारी मध्यरात्री गॅलरीच्या ग्रीनजवल थुंकण्यासाठी गेले होते.तेव्हा त्यांचा तोल गेल्याने पडून मृत्यू झाल्याची माहिती मुलगा सुरज मारलापल्ले यांनी दिल्याने पोलिसांत अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली होती .मृत्यूबद्धल पोलिसांना संशय आल्याने अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली.तेव्हा त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रीत घरावरून फेकून दिल्याची कबुली आई व दोन मुलं या तिघांनी दिली आहे.न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांनी पोलीस कोठडी दिल्याचे सांगितले आहे