दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा : दिनाक.११/०५/२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय मसलगा येथे जल जीवन मिशन पाणीपुरवठा विहिरीसाठी स्वहखुशी ने दिले गावच्या विकासासाठी दोन गुंठे जमीन दानपत्र तर गावकरी बंधूंनी व सर्व परिवारांनी केले गावकऱ्यांच्या वतीने दास(भैया)साळुंके निलंगा तालुका अध्यक्ष छावा यांचा जाहीर सत्कार.दिनांक ११/०५/२०२३ रोजी गावच्या विकास कृती आराखड्याचा नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करत असताना गावच्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विहिरीसाठी ग्रामसभेमध्ये विषय मांडण्यात आला पण सर्व गावातील नागरिकांना कळविण्यात आले व स्वखुशीने पाणीपुरवठ्याच्या विहिरीसाठी दोन गुंठे जमीन लागणार होती पण कोणीही पुढे येऊन जमीन देण्यासाठी तयार नव्हते पण आपल्या गावच्या पुढील उद्भवणाऱ्या पाणी प्रश्नासाठी कुठेतरी पाणी प्रश्न सुटला पाहिजे व आपल्या गावचा विकास नाही थांबला पाहिजे या दृष्टीने मला स्वतःला आपण सुद्धा कुठेतरी गावचे देणे लागतो व गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटत असेल तर काय हरकत म्हणून आपण निशुल्क कुठल्याही अटी न ठेवता व कुठलेही एक रुपयाची अपेक्षा न ठेवता स्वतःहून गावासाठी दोन गुंठे जमीन दान पत्र लिहून दिलो व गावचा प्रश्न पाण्याचा कायमचा मिटला त्याबद्दल गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत कार्यालय मसलगा यांनी सर्वांनी मिळून माझा जाहीर सत्कार केला.यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच गणेश शेळके उपसरपंच आशिष पाटील ग्रामसेवक वसंतजी पोद्दार साहेब आधार ग्रुप अध्यक्ष हरिदास साळुंखे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पिंड बबलू पाटील नामदेव शिंदे अरविंद बनसोडे नागनाथ हनुमंते सुरेंद्र जाधव उमेश शिंदे पांडुरंग शिंदे सुरेंद्र जाधव अंगद हालसे गुरु भाऊ कदम प्रभाकर तेलंगे जनार्दन कांबळे देशमुख अभिजीत कुलकर्णी निखिल बापूराव जाधव दिलीप जाधव संजय नरहारे तसेच सर्व गावकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.