
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा : दिनांक. ११/०५/२०२३ रोजी जागृत देवस्थान मशामाय मंदिराचा गावभर मिरवणूक काढून मोठ्या थाटात माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते कलसारोहन सोहळा संपन्न झाला या जागृत देवस्थानास निधी कमी पडू देणार नाही असे अश्वासन आ.निलंगेकर यानी यावेळी दिले आहे.
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अरविंद चव्हाण,माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश आर्य,माजी प.स.वामनराव भालके,बालाजी मोरे,सरपंच किरण शिंदे,उपसरपंच जगदिश सगर माधव पाटील,गुंडेराव बिरादार, अदि उपस्थित होते.
या देवस्थानाला मी लातूरचा पालकमंञी असताना तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.सध्या २ कोटी निधी आपण दिला आहे या माध्यमातून देवस्थानकडे जाणारा रस्ता व ओढ्याव दिड कोटीचा पुल बांधण्यात येणार आहे.यापुढे मंदिर परीसर सुशोभिकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ असे अश्वासन उपस्थित भाविक भक्तांना आ.निलंगेकर यानी दिले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी भाजपा तालुका संघटक आशिष पाटील,चक्रधर बिरादार, अंगद बिरादार, गजानन बिरादार, संजू बिरादार,अमर सूर्यवंशी, दत्ता होसुरे, सत्यवान सूर्यवंशी, दयानंद शिंदे, सत्यवान बिरादार, , शेखर मिरगाळे,,नरसिंग म्हेञे,,उध्दव बिरादार,आदि गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवशंकर मिरगाळे यानी तर प्रास्तविक
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील जागृत देवस्थान मंदिराचा कलसारोहन सोहळा दिनांक ११ रोजी संपूर्ण गावात मिरवणूक काढून माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर हभप अवधूतपूरी गुरू अनंतपूरी मठाधिश श्री गुरू दामोधर मठ संस्थान अष्टा जहागीर ता.उमरगा जि.धाराशिव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे.तर हभप परमेश्वरी परभणे श्री क्षेञ कल्याण स्वामी संस्थान चकलंबा ता.जि.बिड यांचे किर्तनही या कलसारोहन दिनी संपन्न झाले.या कलसारोहन सोहळ्याला गावातील महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.