
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/केज– केज तालुक्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्यील ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले होते, तेव्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर केज तालुक्यातील ६८ गावातील १२५० बाधित कुटुंब या साठी पात्र ठरले, या पात्र लोकांना शासनाकडून ७५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले होते, परंतु आज चार महिने झालं अनुदान मंजूर होऊनही त्याचे वाटप झालेले नाही.
घराचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं परंतु शासनाकडून मिळणारी तुटपुंजी मदत सुद्धा वेळेवर मिळत नाही. याविषयी आपत्ती व्यवस्थापन विभागात झालेल्या दिरंगाई बद्दल चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्हाला पंचायत समितीकडून ६९ गावातील पंचनामा रिपोर्ट (फोटो, पीटीआर, खातेक्रमांक) मिळालेले नाही त्यामुळे अनुदान वाटपास विलंब झाला.तर पंचायत समितीच्या विभागाने आम्ही दोन दिवसात सर्व अहवाल पाठवून देऊ असे सांगितले परंतु काहीही झाले तरी दोन्ही विभागात समन्वय नसल्यामुळे नुकसानग्रस्तांना मात्र मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीसाठी वाट बघत बसल्याशिवाय पर्याय नाही.