
दैनिक चालु वार्ता मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा
शहरातील दादामिया बडेमिया शेख नावाचे मतिमंद अपंग व्यक्ती आहे , ज्याला शहरातील सर्वजण प्रेमाने “दाद्या” असे म्हणतात तो एक मतिमंद अपंग आहे .
कितीक वर्षापासून अपंग मानधन हक्कदार दादा दादामिया हे अपंग मानधन पासून वंचित होते तरी समाजात कितीक समाज कार्य करनारे नेते मंडळी व समाज कार्यकर्ते असतानाही याच्यावर कोणाचेही लक्ष गेले नाही
पण शहरातील वार्ड क्रमांक सहा चे कर्तव्यदक्ष नगरसेवक गोरगरीब यांच्या सुख दुःख दुःखात सामील होणारे असे समाज कार्यकर्ते विद्यमान नगरसेवक एनडी देवणे यांच्या लक्षात येताच त्यानें अतिशय कमी वेळात स्वखर्चाने संजय गांधी निराधार अपंगाच्या प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रासहित सर्व कागदपत्रे तयार करून तो प्रस्ताव स्वतः तहसीलदार वाघमारे साहेब यांच्याकडून मंजूरही करून घेतला आणि दादामियाला अपंगाचे प्रमाणपत्र काढुन दिले . त्यांचा या कौतुकास्पद कार्यामुळे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे .
तसेच याच कार्यचा दुसरा भाग म्हणजे जनधन खाते उघडण्यास रफिक कुरेशी एसबीआय सेवा केंद्राचे संचालक यांनी व विशाल मल्टी सर्विसेसचे संचालक विशाल प्रधान यांनी प्रस्ताव मोफत ऑनलाइन करून अतिशय मोलाची मदद केली. आता मात्र या सर्वांच्या सहकार्याने दादामिया याला प्रति माह एक हजार 1000 रुपये महिना अपंगाचे मानधन सुरू झाले आहे. .
समाजात अशी काही माणसे असतात की त्यांना कुणीतरी मदत केली की त्यांना फार आनंद होतो व ते ही केलेली मदत विसरत नसतात म्हणून नगरसेवक एन डी दवणे हे नेहमी रस्त्याने येता -जाता दाद्यामिया ते दवणे यांची विचारपूस करतो आणि याच्यातच दवणे ही आनंद व्यक्त करतात अशी कामे केल्यानंतर देवाच्या मंदिरात जायची गरज नाही कारण की देव माणसातच आहे. म्हणून आपली माणुसकी कायम ठेवली तर कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची गरज नाही नगरसेवक शेषनारायण दवणे यांनी प्रतिक्रिया दिली.