
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी-शेख इसाक
लंडन येथील ब्रिटनच्या संसदेत एका भव्य सोहळ्यात ‘भारत गौरव पुस्कार’ आ.सौ. मेघना दीदी साकोरे – बोर्डीकर यांना प्रदान करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, गायत्री परिवाराचे मुख्य चिन्मय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम ब्रिटिश संसदेत पार पडला.
आ. मेघना दीदी साकोरे – बोर्डीकर यांचे सामाजिक कार्य, विकासाप्रती बांधिलकी, कर्तव्यपूर्तीची भावना, पर्यावरणासाठी त्यांनी केलेले कार्य यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जगभरातील तब्बल वीस देशातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार ब्रिटिश संसदेत वितरण होतो. यंदाच्या पुरस्कारकर्त्यांमध्ये आ.सौ. मेघना दीदी सोकोरे बोर्डिकर यांना दिल्याबद्दल जिल्हाभरात कौतुक होत असून या निमित्ताने महाराष्ट्राचे नाव ब्रिटिश संसदेत झळकावण्याचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला आहे, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पिंगळकर यांनी व्यक्त केली. त्यांनी आज परभणी करांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी उपस्थितीत मोहन कुलकर्णी भाजपा कार्यकारणी सदस्य, अशोक सेलगवकर जिल्हाध्यक्ष सहकार आघाडी, दिनेश नरवाडकर सरचिटणीस, रितेश जैन, उमेश शेळके जिल्हाध्यक्ष भाजपा अनु जाती मोर्चा, संतोष जाधव चिटणीस, योगेश महाराज तिवारी, श्रीकांत चव्हाण, पिंटू भाऊ देशमुख, प्रितेश देशमुख, नितीन शुक्ल, कैलास टेहरे, दीपक कासंडे, योगेश पितांबरे, पुरुषोत्तम तोताडे, विकास देशमुख, योगेश काकडे, नरेंद्र सबनीस, प्रथमेश कुलकर्णी व समस्त परभणी कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.