
दैनिक चालु वार्ता वरूड प्रतिनिधी -समाधान कळम.
वरूड (बु.).एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन लाख रूपयांची रोक्कड आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले,ही घटना गुरूवारी दुपारी वरूड बु. ता.भोकरदन येथे घडली.सुदैवाने घरात कोणी नसल्याने जिवीतहानी झाली नाही. वरूड बु.येथिल कडूबाई अंकुश वाघ व कुंटुबातील सर्व सदस्य गुरूवारी कामानिमित्त बाहेर गेले होते.त्याच्या घरातील गॅसचा सिलिंडरचा दुपारी अचानक स्फोट झाला. स्फोट झाल्याचा आवाज येताच ग्रामस्थांनी त्याच्या घराकडे धाव घेऊन लागलेली आग आटोक्यात आणन्याचा प्रयत्न केला परंतु, घरातील कापसाची गंजी व कुंडाची ओसरी पेटल्याने आग आटोक्यात आली नाही. या आगीत कडूबाई वाघ यांनी तीस गोण्या गहू,संसारोपयोगी साहित्य,शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले.या घटनेने वरूड सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.नुकसान भरपाई संबंधित कुंटुबाला शासन,प्रशासनाकडून त्वरित मदत करून द्यावी अशी मागणी होत आहे.