
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:CBSE बोर्डाचा निकाल आज दि. 12./05./2023 रोजी जाहीर झाला त्यात सप्तगिरी पोदार लर्न स्कूल, देगलूर या शाळेचा 100% निकाल लागलेला आहे. या शाळेची ही पहिलीच बॅच असून त्यात विशेष प्राविण्यासह 22 विद्यार्थी पास झालेले आहेत.
देगलूर शहरातील पहिली CBSE शाळा ही सप्तगिरी पोदार लर्न स्कूल असून दहावी CBSE बोर्डाचा निकाल आज लागलेला असून त्यात या शाळेचे एकूण 61 विद्यार्थ्यांनी परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे झाली त्या 61 च्या 61 विद्यार्थी पास झालेले आहेत. कृष्णा शिवचरण गुरूडे 98.2% घेऊन पहिला आलेला आहे. महेश बालाजी गुडफळे- 97.4% घेऊन दुसरा तर रितू संजय देशमुख 97.2% घेऊन तिसरी व सौरव सुरेश वनंजे 97.2% तिसरा आलेला आहे. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे
टक्केवारी
90 ते 100%
22 विद्यार्थी
80 ते 89%
20 विद्यार्थी
70 ते 79%
07 विद्यार्थी
60 ते 69%
07 विद्यार्थी
50 ते 59%
04 विद्यार्थी
4049%
1
एकूण
61 61 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते
संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापवार यांनी व सर्व संचालक मंडळानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले तसेच सप्तगिरी पोदार लर्न स्कूलच्या प्राचार्या कॅरोलीन मार्टीन मॅडम यांनीही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.