
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतीनिधी -समीर मुल्ला
माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पत्रकारिता व्यवसाय करणार्या पत्रकार बांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या मागण्या शासनाने तात्काळ सोडवाव्यात यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने उपविभागीय कार्यालयांसमोर गुरुवार (दि.११ मे) रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन भरीव निधी द्यावा. तर पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. तसेच वृत्तपत्रांना सध्या जाहिरातींवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. तर पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. तसेच कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. तर शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. त्यामुळे लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. त्याबरोबरच साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती देण्यात याव्यात या मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड.शकुंतला फाटक,बजरंग आन्ना ताटे, पोलिस निरीक्षक सुरेश साबळे,बंडुभाउ बनसोडे, सतपाल बनसोडे, किशोर वाघमारे, नितीन पाटील या सर्वांनी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा देऊन मार्गदर्शन केले व विविध पक्ष संघटनेने पाठिंबा दिला यावेळी व्हाइस ऑफ मिडिया मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे,कळंब तालुका पत्रकार संघाचे विस्वस्त सतीश बप्पा टोणगे,जेष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, बालाजी आडसुळ,विलास मुळिक, तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे, उपअध्यक्ष रामराजे जगताप,प्रशिध्द प्रमुख दिपक माळी,कार्य अध्यक्ष रणजीत गवळी,सचिव बाळासाहेब जाधवर, ॲड.समिर मुल्ला,योगिराज पांचाळ,दत्ता गायके,रसुल तांबोळी,समीर मुल्ला ,रामरतन कांबळे,हाणुमंत पाटुळे, सलमान मुल्ला, भिकाजी जाधव, राहुल हौसलमल, जयनारायण दरक,राजेश पुरी,सिंकदर पठाणआदी पत्रकार व व्हाईस ऑफ मिडियाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.