
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील
सोनपेठ तालुक्यात असलेल्या भाऊचा तांडा शिवारातील एका आखाड्यावर सेफ्टी टॅंकची साफ-सफाई करतांना पाच मजूरांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही थरारक व दु:खद घटना गुरुवार दि.११ रोजीच्या रात्री नऊ च्या सुमारास घडली आहे. या घटनेत सदर मजूर गुदमरुन मत्यू पावले असावेत का वीजेचा धक्का बसल्याने याचे नेमके कारण मात्र अद्यापही कळून आले नाही त्यामुळे सर्वत्र चिंताजनक असेच वातावरण निर्माण झाले आहे.
मारुती दगडू राठोड यांच्या आखाड्यावरील सेफ्टी टॅंक सफाईचे काम गुरुवारी दुपारपासूनच सुरू होते. काम करीत असताना ही दु:खद प्रकार अचानक घडल्याचे समोर आला. त्यामुळे सर्वत्र धावपळ झाली. घाईघाईने त्या मजूरांना हलवून उपचारासाठी नेण्यात आले त्यात शेख सादेक (४५), शेख शाहरुख (२०), शेख जुनेद (२९), शेख नवीद (२५), शेख फिरोज (१९) व अन्य दोघांचा समावेश होता. तेथून परळी येथील खाजगी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले परंतु त्यातील पाच मजुरांनी प्राण सोडल्याचे समजले तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेतील मयत पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याने त्या घरावर कोसळलेले संकट भयानक असेच म्हणावे लागेल. मृत्यूचे कारण काही जरी असले तरी कर्तव्य पार पाडताना आलेला मृत्यू हे मुळीच नाकारता येणारे नाही. या दु:खद घटनेमुळे निर्माण त्या परिवाराची अपरिमित हानी झाली, हे वास्तव आहे. परिणामी उजाडलेली ती घरे सावरली जावी यासाठी आर्थिक नुकसान भरपाई मिळली जावी, अशी मागणी पुढे येत असल्याचे सुत्रांकडून समजते आहे. या प्रकरणाचा तपास होऊन कायदेविषयक बाबी पूर्ण होतीलही परंतु ज्यांचा ज्यांचा यात मृत्यू झाला आहे, ते तर परत येऊ शकणार नसून त्या त्या परिवारावर आलेले हे संकट कसे भरुन निघू शकेल हा खरा दुर्दैवी सवाल आहे.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””’
सकाळीच हे वृत लिहिले गेले. त्या वेळीच वृत्त लिहितांना आम्ही आर्थिक मदतीची मागणी करुन मृतांच्या वारसांना दिलासा दिला जावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, दुपारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने ती मागणी पूर्णत्वास नेली जाणार असल्याचे समजले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. एवढेच नाही तर मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या या संदर्भातील योजनेतून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत जखमी मजूरांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.