
दैनिक चालु वार्ता
भिगवण प्रतिनिधि: जुबेर शेख
रोटरी क्लब ऑफ भिगवन व रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. पप्पू यास दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणी येत होत्या त्यामुळे त्यांनी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संपत तात्या बंडगर यांच्याकडे त्यांनी व्हीलचेअरची मागणी केली असता आज ती रोटरी क्लब च्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली व्हीलचेअर दिल्यानंतर लाभार्थी पप्पू जाधव यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून रोटरी चे सदस्य समाधानी झाले.
भिगवण रोटरी क्लब नेहमी समाजाला उपयोगी असे उपक्रम राबवत असतात याचे भिगवण परिसरातून रोटरी क्लब ऑफ़ भिगवण चे सर्व स्थरातून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ भिगवण चे अध्यक्ष संजय खाड़े म्हणाले की,आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही सामाजिक बांधीलकीतुन करण्याचा आमचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न राहील अजुन कोणी दिव्यांग गरजू व्यक्ति असेल तर आम्हाला कळवा त्यांना देखील आम्ही शक्य तेवढ़ी मदत करन्याचा प्रयत्न करू.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे उपाध्यक्ष औदुंबर हुलगे माजी अध्यक्ष संपत बंडगर व स्वप्निल ढोले उपस्थित होते तसेच व्हीलचेअर मिळाल्याबद्दल पप्पू जाधव यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.