दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
.नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात दिग्रस ( बु ) या गावी अतिशय प्रतिष्ठित असलेले लोकप्रिय व्यापारी तथा तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय सिकंदर फतरुसाब शेख यांच मोठे बंधू नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक संघटनेतील एक नामवंत व्यक्तिमत्व जिल्हा परिषद सहशिक्षक महेबूब फतरुसाब शेख यांची मुलगी अनिशा अर्जु उर्फ अंजुम चा शाही भव्यदिव्य विवाह सोहळा दिग्रस नगरीमध्ये पंचक्रोशीतील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. . हा विवाह सोहळा मुस्लिम धर्माच्या रीती रिवाजानुसार जरी पार पडला असला तरीही या विवाह सोहळ्यात सर्वच जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणूनच या सोहळ्यात सर्वधर्मसमभावाच्या एक आदर्श जिवंत नमुनाच पहावयास मिळाला आणि त्याच माध्यमातून माणुसकीचे जिवंत दर्शन घडून आले या भव्य दिव्य विवाह सोहळ्यात मुस्लिम समाजातील आप्तस्वकीयांसह हिंदू धर्मातील हजारो लोकांना शेख परिवाराच्या वतीने मूळ पत्रिका देण्यात आल्या होत्या त्या मूळ पत्रिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे हजारो हिंदू बांधवांना सागवान पासून बनवलेले तीन हजार रुपये किमतीचे देवघर देऊन विवाह सोहळ्यास निमंत्रित करण्यात आले होते तसेच हजारो मान्यवरांचा शेख परिवाराच्यावतीने फेटा बांधून हृदय पूर्ण सत्कार सुद्धा करण्यात आला या विवाह सोहळ्यास महाराष्ट्र सह नांदेड जिल्ह्यातील सामाजिक ,राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील तमाम दिग्गज मान्यवर उपस्थित होते. . या मनाला मोहन टाकणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द ऐकावयास मिळत होता तो म्हणजे काय तो विवाह सोहळा , काय ते डेकोरेशन , काय तो स्टेज , काय ती लाइटिंग , काय ते स्वादिष्ट स्वरूची भोज , काय तो वधूला दिलेला नजराना , काय ती लोकांची गर्दी काय ती रोशनाई अशी चर्चा सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळत होती या विवाह सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच कंधार – लोहा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार रोहिदासजी चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्हा परिषद सदस्य माननीय दशरथराव लोहबंदे , माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव पाटील गिरे , कंधार तालुका काँग्रेस अध्यक्ष बालाजी पाटील पांडागळे, काँग्रेसचे कट्टर समर्थक लालबा पाटील शिंदे तसेच विश्वंभर जयवंतराव पाटील ज्येष्ठ नागरिक आप्पाराव पाटील शिंदे यांच्यासह कंधार पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण कंधार पंचायत समितीचे माजी उपसभापती भीमराव जायभाये यांच्यासह कुरुळा गटातील प्रत्येक गावचे आजी-माजी सरपंच , उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर तसेच प्रत्येक गावचे पोलीस पाटील उपस्थित होते. .शेख व पठाण विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम माजी मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब , विद्यमान आमदार अमर राजूरकर तसेच माजी मंत्री डी.पी. सावंत साहेब व दिग्रस नगरीचे सुपुत्र पोलीस अधीक्षक धोंडोपंत स्वामी यांनी भ्रमणध्वनी द्वारे विवाह सोहळ्यास शुभेच्छा पाठवल्या. या भव्य दिव्य विवाह सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे तालुका काँग्रेस सरचिटणीस सिकंदर फतरूसाब शेख ( पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यापारी ) आणि मुलीचे वडील महेबूब फतरुसाब शेख ( जि.प.सहशिक्षक ) व काका अकबर फतरुसाब शेख ( जि.प.सहशिक्षक ) या सर्वांनी उपस्थितांचे आभार मानून ऋण व्यक्त केले व सदैव आपल्या सर्वांचे ऋणानुबंध असेच कायम राहावे ही अपेक्षा व्यक्त केली. . अशा या मुस्लिम धर्माच्या भव्य दिव्य विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड चे प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव दिग्रसकर व भेंडेवाडी येथील जिल्हा परिषद सहशिक्षक उद्धवराव लटपटे सर या दोघांनी आपल्या सुमधुर वाणीतून केले.