दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:बिलोली तालुक्यातील अटकळी, आदमपूर व खतगाव परिसरात अवैध गुटखा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांचे चांगभलं होताना दिसून येत आहे. हा अवैध गुटखा पुरवठा, बिक्री करणाऱ्या गुटखा माफियांकडे ना पोलिसांची नजर ना प्रशासनाची भीती नसल्याने अवैध गुटखा विक्रेत्याचे मनोबल वाढत जाउन रोजरासपणे गावोगावी जाऊन गुटख्यांनी भरलेल्या पोत्याने विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा प्रतिबंध कायदा हा नावालाच लागू असल्याचे चित्र बिलोली तालुक्यातील अटकळी, आदमपूर व खतगाव परिसरात दिसून येत आहे. या परिसरात भल्या पहाटे देगलूर तालुक्यातील एक तंबाखूजन्य गुटखा माफीया आपल्या मोटरसायकलवरून ३ तेतंबाखूजन्य सागर, आर. एम. डी. यासारख्या अनेक गुटख्याने भरलेल्या पोत्याने दररोज परिसरातील पानपट्टी व किराणा दुकानावर चढ्या भावाने गुटखा विक्री करीत असल्याचे दररोज चित्र दिसून येत आहे. परंतु या गंभीर बाबीकडे पोलिसांसह प्रशासनाकडून दुर्लक्ष संबंधित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या गुटखा माफियावर संबंधीतांनी वेळीच आवर घालून या गुटखा माफियांच्या मुस्क्या आवळल्यास परिसरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील अशी चर्चा होताना दिसून येत आहे. या गुटखा माफियांच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी वेळीच मुस्क्या आवळणार? की यास पाठीशी घालणार यावर नागरिकांत तर्क वितर्क लावले जात आहेत.