
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या व दक्षीण भारतातील महत्वपूर्ण राज्य असलेल्या २०२३ कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल दि.१३ मे रोजी लागला असुन या निवडणुकीत भारत जोडो यात्रेचे प्रणेते तथा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी , प्रियंका गांधी राष्ट्रीय अध्यक्ष खा. मलिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहिलेले महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काम पाहिलेल्या कर्नाटक राज्यातील जनतेने धोक्याने सतेत आलेल्या भाजपा नाकारले व काँग्रेसला स्विकारून दणदणीत विजयी करून स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल लोहा शहरात काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून जल्लोष केला.
यावेळी काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, उपाध्यक्ष उतम महाबळे,कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर, शहराध्यक्ष सोनू संगेवार, गटनेते नगरसेवक पंचशील कांबळे,माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील नळगे , माजी नगरसेवक पंकज परिहार, माजी नगरसेवक अनिल दाढेल, राष्ट्रवादीचे लोहा येथील नेते माजी नगरसेवक रमेश माळी, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शरफौदीन शेख , मौलाना अकबर, माजी सैनिक व्यंकटराव घोडके, शाम नळगे,डी.एन.कांबळे , काशिनाथ भारती, पिनू चुडावकर ,किरण डोईफोडे, पांडूरंग शेटे, भूषण दमकोंडवार,सतार शेख ,यांच्या सह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते .