दैनिक चालू वार्ता फुलवळ सर्कल प्रतिनिधी -नवनाथ वाखरडकर
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने सोमवार दि.१५ मे 2023 रोजी कंधारमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येत आहे. या शोभायात्रेत बसवप्रेमींनी कंधार येथे मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन फुलवळ सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता डांगे यांनी केले आहे.
या शोभायात्रेला दुसरी ३ वाजता माईचे मंदिर, साठेनगर येथून सुरुवात होणार आहे. गांधी चौक, सराफा बाजार, छत्रपती शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक मार्गे ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेचा समारोप श्री बालाजी मंदिर, भवानीनगर येथे होणार आहे. या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता शिवाचार्याचा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
यावेळी श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर, श्री सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, श्री वेदांतचार्य दिगाबंर शिवाचार्य महाराज वसमतकर, श्री गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज महाराज उमरजकर आदी प्रमुख गुरुवर्याची उपस्थिती राहणार आहे.
या शोभायात्रेत कंधार शहरासह तालुक्यातील बसवप्रेमींनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन फुलवळ सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता डांगे यांनी केले आहे.