
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि-अमोल आळंजकर
गंगापुर- शेतकऱ्यांचे गंगापूर बाजारसमितीत कांद्याचा दशक्रियाविधी करून मुंडन आंदोलन केल्याने त्या कांद्याला सातशे रुपये क्विंटल भाव दिला.
गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी गणेश गणगे यांच्या कांद्याला एक रुपया पाच पैसे दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत टाकून कांद्याचा अंत्यविधी केला होता. कांद्याला आठ रुपये भाव द्यावा नसता कांद्याचा दशक्रिया विधी करून मुंडन आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता १२ मे रोजी सकाळी बारावाजेदरम्यान शेतकऱ्यांनी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या गेट समोर शेतकऱ्यांच्या वतीने कांद्याचा दशक्रियाविधी करून मुंडण आंदोलन करण्यात आले. गंगापूर बाजार समिती प्रशासनाच्या वतीने आंदोलन कर्ते शेतकऱ्यांना समाधानकारक कांदा शेतमालाची रक्कम देण्यात आल्याने व यापुढे शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता बाजार समिती घेईल या लेखी आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात भाऊसाहेब शेळके, महेश गुजर, संपत रोडगे, गणेश गनगे, बाळासाहेब जाधव, संकेत मैराळ, भाऊसाहेब गवळी, सुनील बोराटे, देविदास पाठे, योगेश आळंदकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थिती होते