
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर/ पंढरपूर: येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यां सौ रेश्माताई बंडगर यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला ओबीसी सेलच्या शहरध्यक्षपदी निवड करण्यात आली.रेश्माताई यांना लहानपणापासून सामाजिक कामाची आवड असून त्यानी आजपर्यंत गोरगरीबांसाठी ,तळागाळापर्यंत काम केले आहे. महिलांसाठी बचत गटा मार्फत काम केले असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यां म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेश्माताईंची काल राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर ओबीसी सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा साधनाताई रामचंद राऊत यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
तसे पाहिले तर रेश्माताई बंडगर या सर्व सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या महिला नेतृत्व आहे. त्यांनी आजपर्यंत पंढरपूर तालुक्यामध्ये महिला युवक वर्गा मध्ये तसेच सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द पाहीली तर सर्व सामान्य महिलांसाठी तळागाळा पर्यंत काम केले आहे. रेश्माताई बंडगर यांच्या निवडीनंतर आज पत्रकारांनी संपर्क केला असता त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ,अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर, साधनाताई राऊत यांच्या मार्गदर्शना खाली पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असे सांगितले.