
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील जिव्हाळा कला संच व बहुउद्देशीय संस्था .Reg. No. F 18849 .माळेगांव ता,आर्णी जि,यवतमाळ गेल्या पंचवीस वर्षां पासून गणेश उत्सव.दुर्गा उत्सव व लग्न प्रसंगी मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य करीत असून समाजाची सेवा करीत आहे . त्या संचातील जेष्ठ कलावंत तबला वादक श्री.शिवाजी मोरेश्वर चवरे गेल्या पंधरा वर्षांपासून संचाची सेवा करीत आहे .जिव्हाळा कला संचाचे संचालक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री शिवाजी चवरे यांना शाल.श्रीफळ व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले या वेळी श्री. जनार्धन सावळकर तलाठी.अशोक इंगोले.अशोक बनसोडे.सुरेश कांबळे.महेंद्र ढोके. कू.साधना भांडवली व ज्योती शिंदे हे हजर होते