
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील सर्वसामान्य कुटुंबातील अहमद जियाउद्दीन सर्वे या विद्यार्थ्यांने आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर (CBSE) दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले,अकोला येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अहमद जियाउद्दीन सर्वे या विद्यार्थ्यांने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील (CBSE)दहावी बोर्डाच्या परीक्षेत 93% गुण मिळवले असून,अहमदच्या परिश्रमाचे आणि समर्पणाचे फळ मिळाले आहे कारण त्यांनी सर्वच विषयांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवले असून, सावळी सदोबा परिसरातून या विद्यार्थ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे,