
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
आज दि 28/1121 राजा शिवछत्रपती परिवाराची 45 वी ही मोहीम पार पडत आहे सर्व मावळे व रणरागिनी आपापल्या स्वखर्चाने येत असतात स्वच्छता मोहीम साठी 110 मावळे पन्हाळगड या ठिकाणी स्वच्छता साठी आलेले आहेत महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी प्रत्येक किल्ल्यांवर महाराष्ट्राच्या प्रत्येक किल्ल्यांवर हे मावळे जात असतात हा उपक्रम संपूर्ण 22 जिल्ह्यात महाराष्ट्रात स्वच्छता व संवर्धन हेच छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास येणाऱ्या नवीन पिढीला कळावा व हा इतिहास आपला व आपल्या मुलांना आवड निर्माण व्हावी संपूर्ण जगात राज्यांचा वारसा चालावा व नवीन पिढीला कळावा हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे एखादी मुख्य मोहिमेसाठी स्वच्छता म्हणून साठी अडीच ते तीन हजार मावळे महाराष्ट्रात येत असतात वर्षातून दोन वेळा मुख्य मोहिमा घेतल्या जातात आणि त्या वेळी अडीच ते तीन हजार महाराष्ट्रातले संपूर्ण मावळे कार्यकर्ते येत असतात निस्वार्थी सेवा हेच या संस्थेचे ध्येय आहे तसेच गड-किल्ले सोबतच इतरही सामाजिक उपक्रम या संस्थे मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जातात गेले 2015पासून या परिवार काम चालू आहे कोल्हापूरमध्ये पन्हाळगडावर हा परिवार दुसऱ्या व चौथ्या रविवारी येत असतात तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा ,पावनगड, या गडावर या परिवारचा आता काम चालू आहे या परिवारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात व कोल्हापूर जिल्ह्यात सहभाग होणार असल तर त्यासाठी बाबासो जाधव यांच्याशी संपर्क साधावा मोबाईल क्रमांक9637256664 विजय जगदाळे मोबाईल क्रमांक8605468611 तसे पाहता पन्हाळगड हे स्वच्छ सुंदर पहिल्यापासूनच आहे वेळोवेळी पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद कडून दररोजच्या दरोज स्वच्छता केली जातेच तरीपण अशा प्रकारच्या संस्था पन्हाळगडावर येऊन स्वच्छता साठी प्रोत्साहित करत असतात त्यामुळे सलग चार वर्षे पारितोषिक या पन्हा गिरिस्थान नगरपरिषद चे नाव झालेला आहे स्वच्छतेबद्दल गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये पन्हाळगडचा गौरव करण्यात आला पुरस्कार प्राप्त झाल्यास अशा बऱ्याच संस्था आपल्या पन्हाळगडावर स्वखर्चाने व हिरिरीने काम करत असतात त्यामुळेच आज पन्हाळा गड स्वच्छ सुंदर असा पहावयास मिळत आहे संस्थे च्या वतीने आव्हान पर्यटकांना नागरिकांना करण्यात आलेला आहे की हे किल्ले आपले आहेत आणि किल्ल्यांचे संवर्धन संरक्षण स्वच्छता व्हावे व पुढील पिढीला छत्रपती शिवाजी राजांचा हा किल्ला स्वच्छ सुंदर असा राहावा या संस्थेचे वतीने आव्हान आहे दैनिक चालू वार्ता ला माहिती देताना कोल्हापूर राजा शिवछत्रपती परिवारातर्फे विभाग प्रमुख उमेश डाकवे यांनी सांगितले