
दै.चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव येथे चतुर्थ वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या कृषिदूत नकुल कुमावत याने ‘ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम’ अंतर्गत नालेगाव ता. वैजापूर येथे बीजप्रक्रिया, कृषी रसायने फवारताना घ्यावयाची काळजी तसेच आधुनिक शेतीविषयक अँड्रॉइड मोबाईल ॲप वापराबाबतचे सविस्तर प्रात्यक्षिके सादर करून परिसरातील शेतकऱ्यामध्ये एकात्मिक शेतीविषयी जागृकता निर्माण केली.
यावेळी कृषिदूत यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व, बीजप्रक्रिया करण्याची शास्त्रोक्त पद्धत, कृषी रसायने फवारताना व हाताळता घ्यावयाची काळजी, विनामूल्य उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या आधुनिक शेतीविषयक अँपची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.बैनाडे, उपप्राचार्य डॉ.बी.एम.जोशी, कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.बी.शिंदे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.बी.बडे, प्रा.एस.व्ही.गुंड, विषयतज्ञ प्रा.टी.बी.जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी परिसरातील प्रयोगशील शेतकरी विक्रम काकडे,अप्पासाहेब काकडे,अविनाश सोनवणे,ओम प्रकाश कुमावत, प्रेमराज त्रिभुवन,ईश्वर ढेरे,पवन सोनवणे,पवन सोनवणे सौरभ कुमावत, एकनाथ पगार ,मनोज शिंदे , ऋषिकेश काकडे, इत्यादी उपस्थित होते.