
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
दादांच्या शब्दाची प्रचिती लातूर जिल्ह्यातील औसा येथील आमदार अभिमन्यू पाटील पवार आयोजित भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्यात झाली.एकनाथ दादा पवार तसे पिंपरी चिंचवड मनपाच्या धर्तीवर लोहा-कंधार मतदार संघाचा विकास करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.याची अनेक कार्यक्रमात त्यांनी उकलही केलेली आहे.
दादांचे मार्गदर्शक म्हणून संबोधले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.१०) मे रोजी तसे मनोगतात व्यक्त केले.यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांच्या समवेत असलेल्या भाजपा निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकनाथ दादा यांच्या तोंडून वारंवार बोलत असलेल्या शब्दाचा उलगडा झाला.आमदार अभिमन्यू पवार यांनी आपदग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेत जीवन जगण्याची नवी उमेद दिली असल्याचे तसेच भव्य दिव्य असा पारंपरिक देखणा सोहळा नेत्यांना जमत नसून कार्यकर्ताच करु शकतो.असे उद्गार काढले.
यावेळी एकनाथ दादा पवार यांच्या वतीने कंधार येथील उम्रज मठसंस्थानच्या मुबलक प्रमाणात दिलेल्या निधीची आठवणी जाग्या झाल्या.दादांनी लोहा कंधार मतदार संघातील गेली किती दिवसापासून अनेक हात रोजगाराकडे वळवले हे काही नवीन नाही, कंधार लोह्याच्या ग्रामीण भागात असा कार्यतत्पर नेता म्हणजे जणू देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा स्वतः सामान्य कार्यकर्ता म्हणून यांची नक्कीच नोंद झालेलीच आहे. एकंदरीतपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोख हा कार्यकर्ते जपणं, मोठं करणं म्हणजेच ते म्हणतात की नेता कितीही मोठा असला तरी कार्यकर्ता त्याच्यापेक्षाही मोठाच असतो. हेच प्रत्यंतर गेली कित्येक वर्षांपासून लोहा कंधार ची जनता पाहायला वाट पाहत होती.ते पवारांनी येथील जनतेला साध्य करून दाखवत लोकप्रियता मिळवली आहे.
परंतू ती गेली चार वर्षांपासून एकनाथ दादा पवार यांच्या रूपाने जनसंपर्कातून पाहायला मिळत असल्याचे सर्वसामान्य माणूस बोलून दाखवत आहेत.एकनाथ दादा पवार पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे वारंवार मतदार संघ पिंजून काढत आहेत.जेष्ठांच्या, युवकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा हक्काचा कार्यकर्ता मतदारांना मिळाला असल्याचे लोकं चावडीवर वट्यावर, कट्यावर, बाजारात, शेतात, मंदिरावर जन्मभुमीतील दादांच्या गुणांची,कामाची, लग्नसराईतील प्रत्येकांच्या भेटीगाठींची, सुखदुःखात हळव्या मनाचे दादा सर्वांना पाहायला मिळत असल्याचे सर्वत्रच दादांची हवा होतं आहे बुवा अशी उघड पणे जोरदार चर्चा करत आहेत.