
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- चारित्र्याच्या संशयावरून एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आपल्या बायकोचा आधी तिच्या शरीरावर उखळते तेल टाकून नंतर केला कोयत्याने वार अत्यंत निर्धापणे तिचा खून केल्याची घटना अहमदपूर शहरातील राजसारथी कॉलनीत शनिवारी दि,१३/५/२०२३ रोजी सकाळी उघडकिस आली सकाळी दुध देण्यासाठी आलेल्या दुधावल्याने दरवाजा ढकलल्यानंतर हॉलमध्ये पडलेल्या मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला.या संदर्भात अधिक माहिती अशी आहे की , निलंगा तालुक्यातील मूळचा रहिवाशी असकेला नाव वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी वय वर्षे (४३) हा २०११ साली परभणी जिल्ह्यातून अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून बदलून आला होता.तेव्हा पासून तो अहमदपूर शहरातील राजसारथी कॉलनीत पत्नी शामल वैजनाथ सूर्यवंशी वय वर्षे (३५) याला ११ वर्षाची एक मुलगी आणि ९ वर्षाची एक असा दोन मुलीसह वास्तव्यास होता.काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली मोठी मुलगी औरंगाबाद येथे भावाकडे शिक्षणासाठी ठेवली होती.त्यामुळे सध्या घरात वैजनाथ याची पत्नी शामल आणि नऊ वर्षाची मुलगी असे तिघेच वास्तव्यास होते.वैजनाथ हा बायकोच्या चरित्रावर सतत संशय घेत असल्यामुळे त्याच्यात सतत वाद होता .पतीच्या सततच्या मारहाणीमुळे त्याची पत्नी यापूर्वी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती.मात्र नातेवाईकांनी समजूत घातल्यानंतर ती परत आली होती.दरम्यान शुक्रवारी दि, १२/०५/२०२३ रोजी रात्री पत्नी शामल आणि मुलीचे जेवण झाल्यानंतर वैजनाथ यांनी लहान मुलीस मधल्या खोलीत झोपवले आणि पत्नी शामल आणि वैजनाथ हे हॉलमध्ये झोपले होते.रात्री ११ते १२ वाजेच्या सुमारास वैजनाथ यांनी अत्यंत शांत डोक्याने बायकोच्या अंगावर उखळते तेल टाकून नंतर कोयत्याने वार करण्यात आले.यात शामल यांचा मृत्यू झाल्याचे निर्दशनास येताच तो घराचा दरवाजा पुढे करून फरार झाला .पहाटे दूधवाला दुध घेऊन घरी आला. आली त्यांनी आवाज दिला परंतु आतून काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांने दरवाजा ढकलतात हॉलमध्ये रक्ताचा थारोळ्यास पडलेला शामल यांचा मृतदेह दिसला.यांची कल्पना पुलीस यांना दिल्यानंतर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.घटनेची माहिती मिळताच मयत शामल सूर्यवंशी यांचा भाऊ मनोज प्रभाकर ढोले वय वर्षे (२४) रा.श्रीमाळी ता.भालकी जि. बिदर यांने वैजनाथ सूर्यवंशी याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अहमदपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.आरोपी फरार शैलेश बंकवाड चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्यानंतर शिक्षक असलेला वैजनाथ सूर्यवंशी हा फरार झाला आहे.अंगावर उखळते तेल टाकून कोयत्याने वार करण्यात आले. पत्नीच्या शरीरावर उखळते तेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. संदर्भात मयत शामल यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खून केल्यानंतर फरार झालेला वैजनाथ सूर्यवंशी चा शोध घेण्यात येत असल्याचे माहीती अहमदपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड यांनी दिली व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंधोरीकर सर हे करीत आहे