
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
सेवा देणारी अंगणवाडी सेविका रेणुताई रमेश वसावे, सलाम तिच्या कार्याला.
नंदुरबार जिल्यातील धडगाव आणि अक्कलकुवा हे अत्यंत दुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात. त्यातच नर्मदा काठावरील गावाचे संघर्षमय जीवन..
कोरोना काळात या नर्मदा काठावरील अंगणवाड्यात पोषण आहार पोहचवण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
अशा सर्व अडचणीवर मात करत नंदूरबार जिल्ह्यातील चिमलखेळी येथील 27 वर्षीय अंगणवाडी सेविका रेणू रमेश वसावे या दररोज 18 कि.मी. बोट चालवत पोषण आहार वाटपाचे काम करतात.
एकट्याने बोट चालवत रेणूताई या सकाळी 7:30 पर्यंत अंगणवाडीत पोहचतात आणि दुपार पर्यंत त्या काम करतात. दुपारी जेवणानंतर त्या बोट घेऊन पाड्यावर जात आणि संध्याकाळी उशिरापर्यंत त्या घरी येत अनेक वेळी रेणूताई या जेवण आणि बालकांचे वजन काटे सोबत घेऊन पायपिट करून डोंगर चढत. आपल्या वनवासी बांधवांपर्यंत पोहचत.
नर्मदा काठावरील वनवासी गर्भवती महिला बोटीत बसून एकत्रितपणे पोषण आहार घेण्यासाठी अंगणवाडीत येत होते, पण कोरोनाचा भितीमुळे त्यांनी येणं बंद केले होते . त्यामुळे रेणूताई यांनी सहा वर्षांखालील बालकांना आणि गर्भवती महिलांचे आरोग्य आणि विकासावर लक्ष देतात आणि त्याचे वजन करून प्रशासना तर्फे देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचे ते वाटप करतात.
गेल्या सहा महिन्यांपासून नर्मदा नदी पार करत वनवासी पाड्यांपर्यन्त त्या पोहचत आहेत. “दररोज बोट चालवून हात दुखत असले तरी लोकांची सेवा करत मी माझं दुःख विसरते अशा त्या म्हणतात.”