
दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): आर्वी तालुक्यातील बेनोडा (माटोडा) येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नुकतीच श्री संत योगी भिकाराम बाबा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली याचे औचित्यपर ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले कार्यक्रमात सर्वप्रथम श्री संत योगी भिकाराम बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मंचावर उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी श्री आरती व नंतर नवीन फाउंडेशन शाखेचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत उद्घाटन कार्यक्रम पार पडला असतील विधीवतपर उद्घाटन वर कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर फाउंडेशनचे महत्त्व कार्य, हेतू,आणि उद्देश आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले उपरोक्त फाउंडेशनचे औचित्य साधुन आलेल्या पाहुण्यांनी ग्राम स्वच्छता विषयी मार्गदर्शन करीत महत्व पटवून दिले आणि ग्राम स्वच्छता करून गाव स्वच्छ सुंदर केले सकाळी श्री संत योगी भिकाराम बाबा पालखी दिंडी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली यावेळी हर हर महादेव, जय हनुमान, श्री संत गजानन महाराज, श्री संत भिकाराम महाराज अशा गगनभेदी जय घोषाने बेनोडा नगरी दुमदुमली होती येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विधिवत फाउंडेशनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपरोक्त फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश हिंगमिरे,उपाध्यक्ष प्रमोद देशमुख ,सचिव राजेंद्र उर्फ छोटे यादव जिल्हा संघटक राजेंद्र झाडे तालुका संयोजक मोहन कांबळे विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळ बेनोडा व बेनोडा फाउंडेशन अध्यक्ष वेनुबाई गावंडे उपाध्यक्ष अर्चना डेहनकर सचिव सुशिला भागवत सदस्य ज्योती जवंजाळ, विमलबाई गावंडे, सुमनबाई भागवत, शोभा वानखडे, अर्चना जवंजाळ, यमुनाबाई तुमसरे, मनोरमा राऊत, आशा भागवत, आशा गेडाम, आशा एकापुरे, उषा कडू, जालना एकापुरे, सुनंदा वानखडे, आशा गावंडे, ज्योती भागवत, साधना गेडाम, वंदना चव्हाण, शारदा वानखडे, मंदा डेहनकर, मीना डेहनकर, प्रमिला राऊत, विमल मावंदे व गावातील समस्त युवा व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप अल्पोहाराने करण्यात आला