
दैनिक चालु वार्ता पैठण तालुका प्रतिनिधी- गजानन ठोके
शासनाने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या अनुदानित सौर कृषी पंप योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली परंतु सौर पंप बसविताना कंपनीतर्फे उत्तम प्रतीचे साहित्य न वापरल्याने वादळी वाऱ्याच्या वेगापुढे सौर पंपाचे पॅनल हवेत उडून जमिनीवर आदळून फुटल्याने सौर पंपाचे नुकसान झाल्याची घटना कोळी बोडखा ता पैठण येथे घडली असून यात दोन शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की कोळी बोडखा येथील शेतकरी आसाराम निवृत्ती गायकवाड यांच्या गट नं 394 मधील शेतातील विहिरीवर सौर पंप बसवलेला आहे दिनांक 12मे ला दुपारच्या दरम्यान वादळी वारे आल्याने सौर पंपाचे पाच पैनल विस्कटून पडल्याने पंपाचे नुकसान झाले
तर याच गावातील कैलास अंकुश काळे यांच्या गट नं 324मधील विहिरी वरील सौर पंपाचे जोरदार वार्याने पंपाचे दोन पैनल विस्कटून पडल्याने सौर पंपाचे नुकसान झाले दरम्यान या दोन्ही शेतकर्यांचे पंप बंद पडल्याने त्यांना पिकांना पाणी देण्यास अडचण निर्माण झाली आहे यात महावितरणने लक्ष घालून पंप त्वरित दुरूस्त करावे अशी मागणी शेतकर्यांनी महावितरणच्या अधिकार् यांकडे केली आहे