
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: कामगार कल्याण मंडळाच्या
आस्थापनेवरील अर्धवेळ कर्मचारी
हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून अत्यंत अल्पशा वेतनावर काम करीत आहे . त्यांचे वेतन म्हणजे केवळ रु 4150/ रुपये हे आहे .अशा अल्पशा वेतनावर ते कर्मचारी काम करीत आहे. .त्यांच्या न्याय व हक्कासाठी अर्धवेळ कृती समितीने अनेक वेळा निवेदनाच्या माध्यमातून आपल्या समस्या त्यांनी मांडल्या. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या आस्थापनेवर असलेले. राजपत्रित कल्याण आयुक्त , मा.कामगार मंत्री महोदय ,कामगार विभाग 10 . व कामगार कल्याण प्रशासन अधिकारी यांना वारंवार निवेदन, उपोषण पत्र देऊन सुद्धा कर्मचाऱ्यांचा कुठलाही प्रश्न मार्गी लागलेला नाही . 2013 पासून महाराष्ट्र शासन कामगार मंत्री महोदय (पूर्वीचे व तत्कालीन ) यांना सुद्धा वारंवार निवेदने व भेटी घेण्यात आलेल्या आहेत. तरी ही अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे प्रश्न अजूनही दुर्लक्षित आहेत. प्रशासनाकडून व महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडून कुठलीही सकारात्मकता त्यांना मिळालेली नाही . एवढ्या प्रयत्नानंतर त्यांच्या पगारात फक्त कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार मंत्री श्री खाडे साहेब यांनी रूपये 1000 ( एक हजार फक्त) रुपयांची वाढ घोषित केली आहे . याच मंडळाच्या वतीने कामगारांचा सर्वांगीण विकास करण्या करीत कामगारांसाठी वेगवेगळे उपक्रम व योजना राबविल्या जातात .आणि त्याच कार्यालयात राबणारा अर्धवेळ कार्यरत कर्मचारी हा अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे . एवढ्याशा पगारामध्ये उदरनिर्वाह करतो .
सध्या ची महागाई खुप वाढली आहे.कारण तेंव्हा पासून 5 वेतन आयोग लागू झाला.6 वा गेला,7वेतन आयोग ही झाला. आता 8वेतन आयोग लागतो आहे. आणि अर्धवेळ यांना 2013 पासून आज पर्यंत 4150हेचं वेतन देत आहे.10 वर्षात माघाई वाढलेली असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झालेले आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेली सेवा काही उपयोगाची नसून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा त्यापेक्षा मरण बरे असे त्या सर्व अर्धवेळ कर्मचाऱ्यांना वाटते कारण एवढ्या कमी पगारात एकट्याचे भरण पोषण होत .नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. म्हणूनच त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेऊन ते येत्या 22/05/23तारखेला आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहेत.