
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा मा.मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन निवेदनात म्हटले कि दि,१७ मे २०२३ जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत. निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे जिल्हा जलसंधारण (लोकल सेक्टर) कार्यकारी अभियंता जालना श्री झोरावत यांनी बोगस पाझर तलाव दुरुस्तीच्या नावाखाली शासनाचे कोट्यावधी रुपये स्वतःच्या खिशात घालण्यासाठी पाण्यात घातले, बडतर्फ करून सीबीआय चौकशी साठी शिफारस करून कारवाई झालीच पाहिजे कारण जालना जिल्ह्यातील जलसंधारण (लोकल सेक्टर) कार्यालयांतर्गत २०२१/२०२२/ २०२३ या कालावधीमध्ये पाझर तलाव दुरुस्तीच्या नावाखाली अंदाजपत्रक तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी काही लोकांना समोर केले प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर काही बोगस काम करणाऱ्या एजन्सी गाईडलाईन करून व्यवस्थित कामे वाटत केली, जालना जिल्ह्यातील पाझर तलाव दुरुस्तीचे काम करण्याची गरज नाही, कारण १९९५ ते २००९ कालावधीमध्ये पाझर तलाव करण्यात आले ते पाझर तलाव ९०% सपाट जमिनीवर बनवले पाझर जमिनीवर पाझर तलाव असल्यामुळे त्या पाझर तलावात पाणी साठवण होत नाही मग दुरुस्ती करण्याची काय गरज होती असा प्रश्न उपस्थित होतो परंतु आर्थिक कमाई करून घेण्यासाठी झोरावत त्यांनी त्याच गोष्टीचा फायदा घेत दुरुस्तीच्या नावाखाली अनेक काळजात तलावाला मंजुरी आणून पैसे कमावण्याचा साधन निर्माण केले, जालना जिल्ह्यात काही तळे अशा आहेत ते सुद्धा सपाट जमिनीवर आहेत परंतु लिखिज असल्यामुळे संबंधित त्या पाझर तलावाच्या शेतकऱ्यांचे जमीन चिभडत आहे, ते शेततळे दुरुस्ती मध्ये का घेतले नाहीत ? कारण दुरुस्तीचा सर्वे कार्यालयात बसून झाला, प्रत्यक्षात कोणत्याही पाझर तलावाच्या कामावर कोणताही कर्मचारी गेला नाही किंबहुना कार्यकारी अभियंता यांनी अंदाजपत्रक तयार करा अशा प्रकारच्या डायरेक्ट सूचना दिल्यामुळे प्रत्यक्षात कोणत्याही पाझर तलावाची पाहणी करून दुरुस्तीचे इस्टिमेट तयार केलेले नाही, कारण श्री झोरावत कार्यकारी अभियंता लोकल सेक्टर जलसंधारण जालना ही व्यक्ती मास्टरमाईंड असल्यामुळे परफेक्ट भ्रष्टाचार कसा करायचा याचे पूर्वनियोजित नियोजन करून पाझर तलावाच्या दुरुस्तीचा प्लॅन तयार केला, कारण पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला त्या मध्ये अनेक अटी व शर्ती आहेत त्याचे कुठे ही पालन झालेले नाही काम करताना संबंधित एजन्सीने कशा पद्धतीने काम केले याचे चित्रीकरण जिओ ट्रॅक्टर फोटो, प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता यांची कामावर व्हिजिट आहे परंतु ऑनलाईन जिओ टॅग फोटो चित्रफीत आधुनिक पद्धतीचा वापर करून पूर्णपणे बोगस तयार केले आहे, या पाजताना दुरुस्तीच्या कामांमध्ये मजुरांमार्फत काही काम करावे लागते ते जीसीपी पोकलेन आधुनिक यंत्राद्वारे केले, या नियोजित केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी श्री झोरावत कार्यकारी अभियंता जलसंधारण (लोकल सेक्टर) जालना यांना बडतर्फ करून ७ जूनच्या अगोदर या भ्रष्टाचाराची चौकशी करून ज्या एजन्सींना दिले दिले त्याची रिक्वायरी व ज्यांना बिले दिले नाहीत त्यांना दिले देऊ नये अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे. श्री झोरावत यांच्या या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्या बाबत शिफारस करून कारवाई करण्यात यावी हि सेवटी असा इशारा ७ जुन २०२३ या अगोदर कारवाई करण्यात यावी कारण पुरावा नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून योग्य तो निर्णय योग्य वेळेत न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्ह्यातील पाझर तलावावर जाऊन तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.