
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
शहरातील संत नामदेव महाराज मंगल कार्यालयात कै.दुर्गादास पत्रकार प्रतिष्ठानतर्फे दि १९ रोजी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुरस्कारांचे वितरण आयोजित करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांना खासदार संजय राऊत हे मार्गदर्शन करणार आहेत.तर या पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, शिवसेना नांदेड संपर्क प्रमुख बबनराव थोरात,सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, रोहिदास चव्हाण,जिल्हाप्रमुख माधव भाऊ पावडे ,जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे जिल्हा सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील,महिला आघाडी जिल्हाप्रमुख वच्छलताई पुयड, शिवसेना जिल्हा समन्वयक दशरथ लोहबंदे,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे,शिवसेना नेते मुक्तेश्वर भाऊ धोंडगे,उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक,जिल्हा संघटक नेताजी भोसले इत्यादि नेते उपस्थित राहणार आहेत.तसेच कंधार येथील सिंहगड संपर्क कार्यालयात खा. संजय राऊत हे धावती भेट देणार आहेत तरी ज्येष्ठ शिवसैनिक तालुका पदाधिकारी,युवासेना महिला आघाडी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कंधार तालुका प्रमुख परमेश्वर पाटील जाधव यांनी केले आहे.