
दैनिक चालु वार्ता म्हसावद सर्कल
सुनिल पाटिल
म्हसावद– युवा सेनेचे माजी जिल्हाधिकारी राहुल संतोष चौधरी यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यां सह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांचे स्वागत केले
युवा सेनेचे माझी जिल्हाधिकारी राहुल चौधरी गेल्या अनेक दिवसापासून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या संपर्कात होते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काल शनिवारी विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला यावेळी त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते देखील पक्षात दाखलN झाले यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आमदार राजेश पाडवी माजी आमदार शिरीष चौधरी संघटन सरचिटणीस निलेश माळी उपस्थित होते