
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड तालुक्यातील खरबखंडगाव केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिवळी या शाळेला नुकताच आंतरराष्ट्रीय गुनाकन पत्र आ.एस.ओ मानांकन प्राप्त झाले आहे ही आ.एस.ओ प्राप्त झालेली तालुक्यातील पहिली शाळा ठरल्याने मुख्याध्यापक सय्यद अली यांचे कौतुक होत आहे.
ही शाळा पहिली ते चौथी इयत्ता पर्यंत असून 67 विद्यार्थी संख्या आहे दोन शिक्षिका शाळा असलेल्या या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सय्यद अली हे काम पाहतात तर सहशिक्षिका सौ.वर्षा धोंडीराम पाटील या कार्यात आहेत 17 जून 2019 पासून या शाळेत सय्यद अली हे कार्यरत आहेत त्या दोघांनी गेल्या चार वर्षात अथक परिश्रमातून शाळेचा कायापालट केला आहे विद्यार्थ्यांना उच्च गुणाच्या ज्ञानार्जन देण्यापासून ते शाळेत वृक्षारोपण लोकवर्गणीतून संपूर्ण शाळा डिजिटल, ग्रामपंचायत मार्फत सर्व वर्ग खोल्या पाँलीसफर्शी तसेच प्रत्येक वर्गात श्रवण टीव्ही, संगणक कक्ष यांची सुविधा प्रिंटर वर्गखोल्या डिजिटल बोलक्या भिंती विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वतंत्र स्वच्छतागृह हँडवॉश स्टॅन्ड या भौतिक सुविधा सह गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक विविध शालेय उपक्रम राबविण्यात येतात शाळा ही झाडे वेलींच्या सौंदर्यात खुलून गेली आहे इयत्ता पहिलीपासून सर्व मुले इंग्रजी वाचन लेखन करतात शाळेची गुणवत्ता मुलांचे आकर्षित शाळेचे नाव असलेले गणवेश मुलांच्या गळ्यात शाळेची ओळखपत्र त्यामुळे ही शाळा तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नाव रूपाला आणण्यासाठी मुख्याध्यापक सय्यद अली व सहशिक्षिका वर्षा पाटील यांनी बौद्धिक आर्थिक मानसिक शारीरिक परिश्रम घेऊन विविध सामाजिक सांस्कृतिक व खेळ आदी उपक्रम राबविल्याने या शाळेला आंतरराष्ट्रीय गुनाकंन प्रमाणपत्र आएसओ प्राप्त झाले आहे ही तालुक्यातील पहिली शाळा ठरली दरम्यान मुख्याध्यापक सय्यद अली सह शिक्षिका वर्षा पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत असून आमदार डॉ. तुषार राठोड शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथ लोहबंदे , गरविकास अधिकारी सी.एल. रामोड गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे , केंद्र प्रमुख गजानन पवितवार , दिलीपराव देवकांबळे , शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शिवाजी कराळे दिपक लोहबंदे , मधुकर गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे .