
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार/गोणार :- कंधार तालुक्यातील गोणार येथील कदम डी.पी.वरील पोल, बाॅक्स, वायर बसवून द्या अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचे सर्व शेतकर्यानी उप कार्यकारी अभियंता महावितरण कंधार यांना निवेदन देऊन कळवले आहे.गेले वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आठ पोल मोडून गेले आहेत. डी. पी. चा बाॅक्स जळून फुटून गेला आहे. वायर जमीनीला टेकले असून जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२२ रोजी अभियंता अतनुरे यांच्या समोर सर्व शेतकरी बांधवांनी विजबिल भरले होते. दोन वर्षापासून निवेदने अर्ज अनेक वेळा देऊन देखील महावितरण पेठवडज येथील अधिकारी व कर्मचारी कसल्याही प्रकारचे काम करण्यासाठी तयार नसून वरीष्ठ अधिकारी अभियंता कंधार यांनी शेतकर्यांची मागणी मान्य करून लवकरात लवकर पोल, बाॅक्स, वायर बसवून देण्यात यावे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे पवळे दिलीप जळबा, कदम रूक्मिण सुभाष,पवळे गोविंद नागोराव, पवार दत्ता बाबा, पवार ताराबाई शंकर,पवळे मारोती सर्मत,कदम शिवराज सुभाष यांनी उप कार्यकारी अभियंता महावितरण कंधार यांना निवेदन देऊन उपोषणाचा ईशारा दिला आहे.पोल मोडल्यामुळे सायकलचे टायर विहीरीच्या गजाळीला बांधून विद्युत मोटार चालवावी लागत आहे असे शेतकरी बांधवांनी सांगितले आहे.