
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी तालुका भोकर- संदीप किसनराव किसवे
भोकर येथील बाजार समितीच्या सभापती पदी जगदीश पाटील भोसीकर यांची निवड करण्यात आली आहेत तर उपसभापती पदी बालाजीराव शानमवाड यांची निवड झाली आहे जगदीश पाटील यांची पुन्हा वर्णी लागली आहे तर बालाजी राव हे पहिल्यांदा उपसभापती झाले आहेत
भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व टिकून राहिले असून आघाडीला बहुमत मिळाले असून 18 पैकी 13 काँग्रेस 2 राष्ट्रवादी अशाप्रकारे 15 जागेवर विजय मिळवला आहे तर भाजपच्या 3 उमेदवाराने विजय मिळवला आहे बी आर एस या पक्षाला खाते पण उघडता आले नाही जगदीश पाटील भोसीकर यांनी मागच्या सभापती काळात व्यापारासाठी भव्य शेड व बाजार समितीची इमारत उभी केली आहे जगदीश पाटील हे माझी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे निकटवर्तीय मानले जातात व त्यांच्या तोडीचा व्यक्ती संचालक मंडळात कोणीही नसल्यामुळे त्यांची पुन्हा वर्णी सभापतीपदी लागली आहे