दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यात सर्वात मोठी शाळा म्हणजे हणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे नाव अग्रस्थानावर आहे. ही शाळा किमान इ.स. १९६० मध्ये उभारण्यात आली असून या शाळेतून काही विद्यार्थी डॉक्टर झाले, काही इंजिनिअर झाले, काही शिक्षण विभागात विस्तार अधिकारी तर काही शिक्षणाधिकारी झाले. काही शिक्षक तर काही प्राध्यापक झाले असून या सर्व विद्यार्थ्यांना घडवत असताना मात्र या शाळेने स्वताचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात कमी पडले असून या शाळेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याच विभागातून सहकार्यांची भावना दिसून येत नसल्याचे बोलले जात आहे.
सद्याची परिस्थिती पाहता हणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असून या नागरिकांना शौचालयास जाण्यासाठीजिल्हा परिषद शाळेशिवाय कोणताच पर्याय नसल्यामुळे नागरिक सुद्धा शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातच शौचालयास सुरुवात करत आहेत. परंतू या चुकीच्या पद्धतीकडे कुणाचेच लक्ष नसल्यामुळे विद्यालयाचे रूपांतर शैचालयात होत असल्याची चर्चा सुरू आहे..
हणेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे किमान पंधरा ते वीस गाळे असुन आजूबाजूला किमान पंचवीस ते तीस गाळे स्वताच्या मालकीचे असणाऱ्या व्यापाऱ्यांनासुद्धा शौचालयासाठी जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय नसल्यामुळे या शाळेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी हणेगाव ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत शौचालय व मुतारीची व्यवस्था केली तर शाळेच्या आवारात शौचालयास बसण्यावर आळा बसेल व शाळेचे अस्तित्व टिकून राहिल अशी चर्चा या भागातील नागरिकांमध्ये होत आहे.