
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
सप्तगिरी पोद्दार गर्ल स्कूल देगलुरचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी सौरव सुरेश वनंजे हा सीबीएससी बोर्ड परीक्षेत 97 टक्के गुण घेऊन आपल्या यशाची उत्तुंग भरारी घेतली.
या शाळेची ही पहिलीच बॅच आहे. तरी या शाळेतील मेहनती शिक्षक आणि शाळेचे माजी प्राचार्य श्रीमान शेखापुरे सरांच्या मार्गदर्शनाने या मुलांनी नांदेड मधील सीबीएससी शाळांच्या तुलनेत देगलूरसारख्या ग्रामीण भागात यशाची उतुंग अशी मुहूर्तमेढ रोवली.शाळेतील 9मुलांनी 95%पेक्षा अधिक तर 22 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.यात सौरव ची गुणवत्ता ही वाखण्यासारखे आहे.तो शिवशंकर माध्यमिक विद्यालय वनाळीचे मुख्याध्यापक सुरेश वनंजे यांचा मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल माजी मंत्री मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर,साई शिक्षण संस्थेचे सचिव मा. बाळासाहेब पाटील खतगावकर डॉ.सौ.मीनल ताई पाटील खतगावकर,रवी पाटील खतगावकर व साई शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्याला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्याच्या या देवी पेमान यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.