दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती -श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : नगरपालिकेची मालमत्ता असलेली नवीन बस स्थानक समोरील जकात नाका आज २२ मे रोजी दुपारी १ वाजता मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथक मोहीम अंतर्गत जकात नाक्याला सिल करण्यात आले.
अनाधिकृतरित्या चालणाऱ्या योगीराज केला & फ्रूट सप्लायर्स निशिकांत मोरे हे सदर जागेवर व्यवसाय करीत होते.न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी सदर जागेवर कोणीही मालकी हक्क आणि हस्तक्षेप करणार नाही अशी नोटीस त्या ठिकाणी सिल करून लावण्यात आली आणि सदर जागा न.प.कार्यालय अंजनगाव सुर्जी यांनी ताब्यात घेतली.
आज दिनांक २३ मे रोजी न.प. अंतर्गत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती न.प. प्रशासनाने दिली.