
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा: लेखक ,विचारवंत ,समाजसुधारक,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी व जिजाऊ ब्रिगेड लोहारा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी श्रीफळ फोडण्या ऐवजी महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र असलेले पुस्तके विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश गोरे यांनी केले तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार रंजनाताई हासुरे यांनी सांगितल्या, यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रंजना हसुरे प्रतिभा परसे, मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे ,संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष महेश गोरे, ,शंभू वाले, ओमकार चौगुले ,प्रशांत थोरात ,सुरज माळवदकर,सचीन ठेले, तसेच इतर मान्यवर अविनाश माळी ,बाळासाहेब पाटील ,श्याम नारायणकर जालिंदर भाऊ कोकणे, बाबा शेख, उमेश देवकर आयुब शेख नानासाहेब पाटील, सुनील ठेले, अमोल माळी, दिपक रोडगे, तसेच तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक अभिवादनासाठी उपस्थित होते .
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचे चरित्र असलेले पुस्तके विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले.