
दैनिक चालु वार्ता चाकुर तालुका प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
चाकूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नीलकंठ मिरकले तर उपसभापतीपदी मंगल दंडीमे यांची निवड
गुप्त मतदान घेऊन सभापती व उपसभापतीची निवड
चाकुर ता.प्रः-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी निळकंठ मिरकले यांची, तर उपसभापतिपदी मंगल दंडीमे निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस.लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली चाकुर बाजार समितीच्या निवडून आलेल्या संचालकांची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत सभापती पदासाठी निळकंट मिरकले भाजपाच्या वतीने तर मविआच्या वतीने यशवंतराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर उपसभापती पदासाठी भाजपा कडुन मंगल दंडीमे तर मविआ कडुन उमाकांत अचवले यांनी नामनिर्देशन दाखल केले. एका जागेसाठी दोन नामनिर्देशन पञ दाखल झाल्यामुळे निवडणूक घेण्यात आली.गुप्त मतदान घेण्यात आले.निळकंट मिरकले यांना १० मते मिळाले तर यशवंत जाधव यांना ०८ मते मिळाले सभापती म्हणून निळकंट मिरकले १० विरुध्द ०८ मतांनी विजय घोषित करण्यात आले.उपसभापती पदासाठी दोन नामनिर्देशन पञ दाखल करण्यात आले होते.भाजपा कडुन मंगल दंडीमे तर मविआ कडुन उमाकांत अचवले यांनी नामनिर्देशन दाखल केले.गुप्त मतदान घेण्यात आले.यात भाजपाच्या मंगल दंडीमे यांना १० मते मिळाले तर मविआचे उमेदवार उमाकांत अचवले यांना ०८ मते मिळाले.भाजपाच्या उमेदवार १० विरुध्द ०८ मतांनी विजय घोषित करण्यात आले. सभापती व उपसभापतीची निवड निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.लटपटे यांनी जाहीर केले. बुधवारी सकाळी बाजार समितीमध्ये चार अर्ज आल्यामुळे गुप्त मतदान घेण्यात आले.नुतन सभापती आणि उपसभापती संचालक मंडळ यांचा माजी राज्यमंञी विनायकराव पाटील यांनी शाल,हार,श्रीफळ देऊन सत्कार केला.नुतन सभापती आणि उपसभापती संचालक मंडळ यांचा माजी राज्यमंञी विनायकराव पाटील यांनी शाल,हार,श्रीफळ देऊन सत्कार केला.निवडीच्या वेळी माजी आ.बब्रुवान खंदाडे,मा.आ.सुधाकर भालेराव,किसान मोर्चा सरचिटणीस दिलीपराव देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर,माजी सभापती प्रशांत पाटील,ॲड भारत चामे,तालुका अध्यक्ष शिवाजी बैनगीरे,संतोष माने,सिध्देश्वर पवार,अभिमन्यु धोंडगे,मच्छिद्र नागरगोजे,रणजीत मिरकले,दयानंद सुर्यवंशी,सह भाजपाचे अनेक पदधिकारी व कार्यकर्तेमोठ्या संखेने उपस्थित होते.