
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- ग्रामीण आदिवासी भाग असलेल्या विक्रमगड तालुक्यातील तिवसपाडा या पाड्यात सामाजिक संस्थानी एकत्रित येऊन केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजनात आपले मानवाधिकार फाउंडेशन,कृष्णा आय व्हीजन,माझे माहेर सेवाभावी संस्था,युवा सामर्थ्य प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने तिवसपाडा या आदिवासी पाड्यात मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजनात ८१ रुग्णांची तपासणी करून २० गरजू रुग्णांना चष्मे देण्यात आले व ३० रुग्णांच्या डोळ्यांची मोफत शास्त्रक्रिया कृष्णा आय व्हिजन मार्फत करण्यात येणार आहे.या शिबिरात नेत्र तज्ञ डॉ.दिपक पांचाळ, कल्पेश पष्टे,योगिता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने पाड्यातील लोकांची नेत्र तपासणी शिबिरासाठी टीम कार्यरत होती.
ग्रामीण भागात या सामाजिक संस्था विविध समाजपयोगी कार्य करीत असून या नेत्र तपासणीच्या माध्यमातून लोकांना आपल्या डोळ्याविषयीचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या बाबतचे मार्गदर्शन ह्या तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.या सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून शिबिराच्या आयोजनासाठी युवा सामर्थ्य प्रतिष्ठानने विशेष पुढाकार घेऊन व आपल्या सहकारी संस्थांच्या संयुक्त उपक्रमाने शिबिर यशस्वी पार पडले.या वेळी युवा समाजसेवक दिवेश पष्टे (आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याण क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यकर्ता पुरस्कृत),आपले मानवाधिकार फाउंडेशनचे संचालक डॉ.दिपेश पष्टे,माझे माहेर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुषमा कासारे,युवा सामर्थ्य प्रतिष्ठानचे संस्थापक मुकेश वातास उपस्थित होते.या नेत्र तपासणी शिबीरासाठी युवा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले व गावातील स्थानिक ग्रामस्थांचा या शिबिरात प्रत्यक्ष सहभाग राहिला.