
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
कोरोनाचा नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट आता समोर आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये, याकरिता कडक पावले उचलण्यात येत आहेत. त्यातच येत्या २ दिवसामध्ये राज्यात प्राथमिक शाळा सुरु होणार आहेत. यामुळे व्हेरिएंट आढळल्यावर शाळा सुरु होणार की नाही, यासाठी संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ओमीक्रोन व्हायरसचा महाराष्ट्रामध्ये तूर्तास तरी काही प्रभाव नसल्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. मात्र, काळजी घेणे अतिशय गरजेचे असल्याचे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्शवभूमीवर शाळा उघडण्याच्या निर्णया विषयी निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.
शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबर पासूनच सुरू होणार असल्यासाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. अजून तरी ओमिक्रॉनच्या संदर्भात राज्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही. कारण त्याचे अजून कुठेही लागण झाल्याचे दिसत नाही. तसा कोणत्याही जिनोम स्विकिंगचा रिपोर्ट नाही. यामुळे त्याची आज चिंता बाळगण्याची गरज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एवढ्या पद्धतीने लागण झाली आहे. यामुळे आपल्याला काळजी घेतली पाहिजे, असेही देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे की, शाळा ही ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेनुसारच १ डिसेंबरला सुरू होणार आहे. शाळेविषयी आरोग्य विभागाने परवानगी दिली असली, तरी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या विषयी अनुकलता दाखवली असल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे