
एन. सी. सी. विभागा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमण मोहीम
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
पन्हाळा ते विशाळगड शिवकालीन ऐतिहासीक मार्गावर दि. २७ नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२१ याकालावधी दरम्यान सुरू रहाणार असुन या शिबीराचे मदतीसाठी ५६ महाराष्ट्र बटालीयन एन. सी. सी कोल्हापुर यांचे वार्षिक प्रशिक्षण शिवीर क. ३१० दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी अंबरखाना पन्हाळा येथे सुरू झालेले असून यामध्ये कोल्हापुर सह इचलकरंजी, जयसींगपुर, कुरूंदवाड, वारणानगर, गारगोटी, अर्जुननगर, गडहींग्लज व आजरा येथुन १०० महाविद्दालयीन एन. सी. सी. छात्र सहभागी झालेले आहेत. त्यांना दररोज युध्द हस्तकला, कवायती, रायफल प्रशिक्षण, नकाशा वाचन आणि आरोग्य व स्वच्छता इत्यादीचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच पन्हाळा चे गाईड हनीफ नगारजी यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास व पन्हाळगडचा इतिहास त्यांना सांगितला जात आहे
तसेच दि. २८ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२१ या दरम्यान एकुण १६ परराज्यातील प्रत्येक दिवशी २५० छात्र पन्हाळा येथे येत असुन ते पन्हाळा ते विशाळगड मोहीमेसाठी प्रत्येक दिवशी २५० छात्र या प्रमाणे रवाना होणार आहेत. सदर ची मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व देशभरात पोहचणे हा या मोहीमेचा उद्देश असुन ही मोहीम यशस्वी होणेसाठी कोल्हापुर गट मुख्यालयाचे गटप्रमुख विगेडीयर समीर साळुंखे यांच्या मार्गदर्शना खाली पन्हाळा येथे पहील्या टप्याचे कॅप कमांडंट कर्नल डी. एस. सायना सीओ ५६ महाराष्ट्र बटालीयन एन. सी. सी. कोल्हापुर यांच्या नेतृत्वाखाली होत असुन त्यांच्या समवेत कर्नल एस. गणपती व ५६ महाराष्ट्र बटालीयनएन. सी. सी. चा सर्व आर्मी स्टाफ व सीव्हीलीयन स्टाफ सहभागी झालेला असुन मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वजन सहभागी झालेले आहेत.