
दैनिक चालु वार्ता
मुंबई – कंगनानं आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन एक फोटो शेयर केला आहे. कंगनाच्या त्या फोटोमध्ये तिनं दोन व्यक्ती एकमेकांची गळाभेट घेताना दर्शवण्यात आले आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, ‘तेरे लिए हम हैं जिए…कितने सितम हम पे सनम…’ या कॅप्शननं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मी प्रेमावर विश्वास ठेवते. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मला ते सर्वांत सुंदर वाटतं. अशाप्रकारची भावना देखील तिनं यावेळी व्य़क्त केली आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणूनं कंगना आता प्रसिद्ध झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिनं देशाच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये तिनं देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक असल्याचे म्हटले होते.खरे स्वातंत्र्य देशाला 2014 मध्ये मिळाल्याचे तिनं सांगितले. अनेकांनी तिला या वक्तव्यावरुन ट्रोल केले होते. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी तिला नावं ठेवली. मात्र कंगनावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. देशातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये देखील तिच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र त्याचा तपास अद्याप सुरु असल्याचे सांगण्यात येतं आहे.
आता कंगनाची एक गुड न्युज समोर आली आहे. तिनं सोशल मीडीयावर एक फोटो शेयर केला आहे. त्यातून तिच्या चाहत्यांनी कंगना ही एका रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधला आहे. यापूर्वी कंगना अध्ययन सुमन, ऋतिक रोशन सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा व्हायरल झाल्या होत्या. त्यात ऋतिकसोबतच्या रिलेशनशिपची चर्चा एकेरीवर आली होती. त्यात त्यांची भांडणंही झाली होती. आता कंगना पुन्हा एका बड्या नेत्यासोबत रिलेशनशिपसोबत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अद्याप त्याचं नाव चर्चेत आलं नसलं तरी चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.