
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी-माधव गोटमवाड
लोहा:-
लोहा शहरातील तरुण युवक कै. रवि काहाळेकर या युवकास 10 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास लोहा पोलिस ठाण्याच्या जवळ बसस्थानक समोर तिन अनोळखी अज्ञात व्यक्तींनी रवी कहाळेकर ह्या युवकास चाकू हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना त्याला तिथून पुढील उपचारासाठी मुंबईसाठी हलवण्यात आले होते .तो 20 दिवसाची उपचाराची अपयशी झुंज अखेर काल दिनांक 28 नोव्हेंबर रोजी प्राणज्योत मावळली . दिनांक 29 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी कडुन लोहा पोलीस निरीक्षक संतोष तांबे सर यांना निवेदन देण्यात आले आहे. लवकरात लवकर रवी काहाळेकर यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी व 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश आनेराव यांनी केली आहे.लोहा शहरात वाढत्या चोऱ्या लूटमार ह्या घटना वारंवार घडत आहेत. लवकरात लवकर मृत रवी काहाळेकर यांच्या आरोपीस अटक करून सहकार्य करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी कडून लोहा पोलिसांच्या कारभाराच्या विरोधात लोहा पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल जर काही त्याच्यामध्ये कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास लोहा पोलीस जबाबदार राहतील असे म्हटले आहे या निवेदनावर यावेळी उपस्थित पिंटू वडे, सदानंद धुतमल, पांडू शेठे, दत्ता वसमतकर आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.