
दैनिक चालु वार्ता
मुंबई : चित्रपटाचं नाव का बदललं? हे कळायला मार्ग नाही. पण चर्चा खरी मानाल तर ‘मे डे’ हे शीर्षक लोकांना फार अपील करू शकलं नव्हतं. कदाचित याचमुळे चित्रपटाला ‘रनवे 34’ हे नाव देण्यात आलं.
सत्यघटनेवर आधारित असलेला ‘रनवे 34’ हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजय देवगण हा या चित्रपटाचा निर्माता असून तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
‘मे डे’ नावाचा सिनेमा घेऊन येणार होता. अजय आणि सोबत महानायक अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंग अशी दमदार स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची चाहते आतुरतेनं प्रतीक्षा करत होते.पण आता ‘मे डे’ नाही तर ‘रनवे 34’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. होय, ‘मे डे’चं नाव बदलून या चित्रपटाचं ‘रनवे 34’ असं नवं नामकरण करण्यात आलं आहे.
‘रनवे 34’च्या फर्स्ट लुक पोस्टरमध्ये अजय, अमिताभ व रकुल दिसत आहेत. अजय व रकुल पायलटच्या भूमिकेत आहेत. सिनेमाचा फर्स्ट लुक जारी करत अजयने एक स्टेटमेंटही जारी केलं आहे.
त्यात तो म्हणतो, ‘रनवे 34’ हा एक इमोशनल व हार्ड ओक्टेन थ्रीलर सिनेमा आहे. हा चित्रपटाची प्रेरणा काय, हे मी सांगू इच्छितो. एका क्षणाला आपण खूप अख्खं जग जिंकू शकतो, असं आपल्याला वाटतं आणि दुसºयाच क्षणाला आपण प्रचंड हतबल होतो. मनात सुरू असलेलं वादळ भावनांशी खेळतं आणि तुम्हाला छिन्नविछिन्न करून सोडतं. हे एक वाईट स्वप्नं आहे की वास्तव, अनेकदा हा प्रश्न पडतो. ‘रनवे 34’मध्ये याच भावना दर्शवणारा चित्रपट आहे. ही स्क्रिप्ट दुर्लक्षित करणं शक्य नव्हतं आणि मी हे आव्हान स्वीकारलं. अमिताभ बच्चन, रकुल प्रीत सिंग, बोमन इराणी, आकांक्षा सिंग, कॅरी मिनाटी अशा दमदार कलाकारांची सोबत मिळाली.
‘रनवे 34’ हा अजयचा दिग्दर्शक म्हणून तिसरा सिनेमा असणार आहे. 2008 मध्ये प्रदर्शित ‘यू, मी और हम’ या सिनेमाद्वारे त्यानं दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ‘शिवाय’ हा त्यानं दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा होता.