
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
लोहा:- तहसील येथे उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणाच्या उपलब्ध सिंचन व बिगर सिंचन पाण्याच्या नियोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब, जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, पाटबंधारे नांदेड दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष चौगुले, सदस्य सचिव विनायक देसाई, तहसीलदार वेंकटेश मुंडे, कृ.उ.बा.स. कंधार सभापती ज्ञानेश्वर चोंडे, खरेदी विक्री संघ लोहा उपसभापती श्याम अण्णा पवार, शाखा अभियंता बी. जी पाटील, संचालक सुधाकर सातपुते, संचालक अनिकेत पा. जोमेगावकर, सिद्ध पाटील वडजे, संतोष मूकणर, नागेश पा. खांबेगवकर, मारोती कदम सह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सिंचनामध्ये रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामामध्ये लोहा, कंधार तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामात ५ पाणी पाळ्या सोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे.